Monday, June 21, 2010

Indianapolis- Madison Via Chicago

अमेरिकेमध्ये आल्यावर कुठल्याच सुट्टीमध्ये माझा मुक्काम कधी Houston मध्ये राहिलेला नाही. कधी मंदार काका कडे Austin तर कधी अमित कडे Ventura आणि Summer मध्ये तर चक्क Indianapolis....(Spring मध्ये जोशात येऊन internship चा नाव, गाव, पत्ता , कूळ काहीही न पाहता दिसली internship की कर apply या धोरणाची हि कृपा.... )
तर अशा तर्हेने अस्मादिक DAS मध्ये summer internship साठी मजल-दरमजल करत(माझ्या बाबतीत होणारे नेहेमीचे घोळ निस्तरत जसे- विमान delay होणे, Connecting flight miss होणे ) येऊन पोहोचले. गाव पाहायचा तर जवळ गाडी हवी पण ती जवळ नसल्याने दररोज तास- २ तास चालणे तब्येतीला कसा बेतशीर आहे हे समजावत माझे आणि मैत्रिणीचे पदभ्रमण सुरु झाले...आणि हळू हळू आम्ही Indy explore करू लागलो.
तेवढ्यात announcement झाली, long weekend chi.. सलग ३ दिवस सुट्टी. या सुट्टी मध्रे नुसता बसून करणार काय....आणि एकंदर exploration मध्ये Indianapolis चा जीव फार काही मोठा नसल्याचा माझ्या लक्षात आला होता...:)
आलोक ला भेटायची उत्सुकता आणि इथे आहोत तेवढ्या दिवसात जमेल तेवढा US पाहायचा असल्याने Madison ला जायचा बेत नक्की केला. शेवटी, भवति न भवति होऊन तिकीट काढायचे काम आलोकलाच outsource केले. आता सर्व तयारी करून, Bags भरून तिथे जायला सज्ज झाले.
(सोबत आलोकच्या Expert comments होत्याच - २ दिवस कुठे जायचा असो किंवा आठवडा भर, आमच्या वरदाची बाग तेवढीच भरलेली असणार....वगैरे वगैरे...) या सगळ्याकडे कानाडोळा करून शेवटी एकदाची Madison ला जायला निघाले...
ऑफिस मध्ये १ मैत्रिणीने घरी drop करेन असा promise देऊन ditch दिला. त्यामुळे माझ्या पैसे बचाव आंदोलनाला मुहूर्तालाच सुरुंग लागला. Indy 500 आणि Long weekend मुले तुफान traffic .....त्यामुळे माझा अर्धा श्वास वर आणि अर्धा खाली... कुठेही १५ मिनिटे लवकर जाण्याच्या कोकणस्थी खाक्याला धक्का नको न पोहोचायला..त्यामुळे Cab driver ला गाडी हाणायला सांगितली...आणि ४.२५ ला stand वर पोहोचले. गाडी ला सर्वात उशिरा येणारे आपण च आहोत असे भाव घेऊन खाली उतरले आणि पाहते तर तिथे २-४ लोक हि नव्हते. बस ची वेळ होऊन अर्धा तास उलटून गेला तरी बस ची काही चिन्ह दिसेनात... शेवटी अनेक खटपटी लटपटी केल्यावर बस आली एकदाची.
आलोक उवाच- बस मध्ये काळे कुत्रे हि नसते...वर जाऊन पाहते तर काय बस खचाखच भरलेली... शेवटी एका जाड बाई शेजारी स्वतः ला कोंबून adjust करून घेतले आणि गाडी सुटायची वाट पाहत बसले. आजूबाजूला प्रवाशांचा गोंधळ सुरूच होता. (अगदी ST ची आठवण...) एक एक शहर पुढे जायला लागले तशी driver ने announcement केली की गाडीला २ तास उशीर होईल. लोकांनी आपापले फोन काढून ताबडतोब इष्ट जनांना फोन लावले आणि आपापसात कुरकुर करायला सुरवात केली. सर्वांबरोबर मी सुद्धा कधी एकदाचे शिकागो येते याची lunch time कधी होतो याची सुद्धा जितक्या आतुरतेने वाट पहिली नसेल त्याहून अधिक आतुरतेने वाट पाहायला लागले.
शेवटी ८.१५ ला बस शिकागो ला पोहोचली. मधल्या वेळात अलोक ला निदान ४ वेळा फोन करून झाला होता. समान घेऊन चपळाईने उतरले आणि पुढच्या क्षणी आलोक ला फोन- आता कुठल्या stop वर उभी राहू? खरा तर तो stop १ मिनिटावर पण नव्हता, पण अलोक म्हणतो तसा (hello , मी आत्ता डावे पाऊल टाकले आहे , आता उजवे कुठे टाकू हे विचारायला सुद्धा तू फोन करशील...)
शेवटी Madison च्या बस मध्ये बसले..... आई ला फोन केला...madison ला रात्री १२ वाजता पोहोचणार असल्याने आधीच आई धास्तावली होती...आणि आलोक, वेळेवर घ्यायला येईल ना ग? या आईच्या प्रश्नाने मला पण विचारात टाकला होता...:) सगळे विचार मागे सारून शांतपणे गाणी ऐकत बसले तर एका ठिकाणी गाडी थांबल्यावर सगळेच लोक उतरायला लागले. म्हटला, आता पुढचा प्रवास मी एकटीच आहे वाटता... मग शेवटी गाडी रिकामी झाल्यावर चौकशी केली तेव्हा कळला, की इथे गाडी बदलतात. आता सगळा समान घेऊन दुसरी गाडी शोधून परत त्यात बसले आणि मग १ तासामध्ये Madison ला पोहोचले. आई आणि माझी भीती निष्फळ ठरवत चक्क आलोक मला घ्यायला on time आला होता..:)
Already १२ वाजून गेले असल्याने सकाळी ६.३० ला उठून बाहेर जायचा अलोक चा बेत मी हाणून पडला...तरीही ८-८.३० वाजता तयार होऊन आलोक मला university, त्याचा department दाखवायला घेऊन गेला..का कोणास ठाऊक, पण माझ्या मनात उगाचंच Madison या गावाबद्दल aversion होता... पण madison पहिल्या पहिल्याच मी त्याच्या प्रेमात पडले...छोटासा, टुमदार गाव...rather, university town...कसलीही गडबड नाही, गोंधळ नाही..शांत, संथ... आम्ही २ सकाळी मेंदोता लाके वर पोहोचलो... खूप निसर्गरम्य आणि शांत जागा होती ती...आणि आलोक ची university ...बाप रे...इतकी वेगवेगळी departments आणि campus माझ्यासारख्या छोट्या university मधल्या कोणाचेही डोळे दिपावाणारच होता..मग Capitol building पाहण्यासाठी downtown कडे निघालो तर वाटेत आपल्या चतुश्रुंगीच्या जत्रेसारखे वेगवेगळे stalls लागले...माझे पाय तिकडेच रेंगाळायला लागल्यावर अगं आपल्याला इथे येताना यायचंच आहे अशी आलोक ने समजूत काढली..(बहुतेक त्याला माहिती होता की आम्ही येईपर्यंत ती सगळी जत्रा बंद होणार आहे...) Tour guide ने आम्हाला कॅपितोल ची छान सैर घडवून आणली...Governor office , supreme court आम्ही पहिल्यांदाच पहिला.. मग संध्याकाळी घरी आल्यावर आलोक ने हळू च सांगितला" अगं वरदा, मी ना माझ्या मित्रांना जेवायला बोलावलंय...त्यांना सांगितलाय, आमच्या कडे पावभाजी चा बेत आहे...वरदा येणारे ना त्यामुळे पावभाजी खायला या...(हे बरं आहे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र....:)) मग रात्री पावभाजी आणि आलोक च्या मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा रंगल्या... दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच Del Sol water पार्क ला गेलो.. पार्क मस्त होता, पण सगळे खेळ एकाच तत्वावर .....घसरगुंडी......:)
मग, रात्री विस्कॉन्सिन river ची बोट ride असा भरगच्च दिवस घालवल्यावर दमून भागून घरी आलो...दुसऱ्या दिवशी back to Indianapolis......
इतका सव्य- अपसव्य करत Madison ला गेल्यावर दोन दिवस कसे गेले ते कळलाही नाही...आणि शेवटी तोच सगळा प्रवास करत Indianapolis ला परत आले...पण जातानाची उत्सुकता आणि उत्साह मात्र कुठे तरी लोप पावला होता....